कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:36 AM2021-09-23T04:36:01+5:302021-09-23T04:36:01+5:30
२. खेड शहरासह ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात येत असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कार्यान्वित कंटेन्मेंट ...
२. खेड शहरासह ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात येत असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कार्यान्वित कंटेन्मेंट झोनची संख्याही घटल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. सद्य:स्थितीत एकही कंटेन्मेंट झोन कार्यान्वित नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तालुक्यात १,२४० कंटेन्मेंट झोन कार्यान्वित करण्यात आले होते. तसेच आजपर्यंत एकूण ६,७२९ रुग्ण सापडले असून २२१ बाधितांचा मृत्यू झालेला आहे.
३. गणेशोत्सव कालावधीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होणार असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. मात्र, जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे वाटत असतानाच आता अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मागील रविवारपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. तसेच मृतांच्या संख्येतही घट झाली होती. मात्र, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही कमी नव्हती.