कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:34+5:302021-09-25T04:34:34+5:30
२. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी येथील माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेला संस्थेचे सदस्य संतोष जगन्नाथ सुर्वे यांनी १२५ मास्क भेट दिले. या ...
२. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी येथील माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेला संस्थेचे सदस्य संतोष जगन्नाथ सुर्वे यांनी १२५ मास्क भेट दिले. या शाळेमध्ये कुंभारखाणी बुद्रुक, कुचांबे, राजिवली, कुटरे, मुरडव या गावांतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याचा दृष्टिकोन ठेवून मास्क लावणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सुर्वे यांनी मास्कचे वाटप केले.
३. खेड तालुक्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत चालली आहे. गेल्या ७ दिवसांत कोरोनाचे १८ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २३ दिवसांत ६१ रुग्ण सापडले आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६,३२२ इतकी झाली आहे, तर सद्य:स्थितीत २७ रुग्ण सक्रिय आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोना नियंत्रणात आल्याने आरोग्य यंत्रणेसह ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे.