कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:54+5:302021-09-27T04:34:54+5:30
२. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरी या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्ह्यात आजपर्यंत २,४१५ ...
२. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरी या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्ह्यात आजपर्यंत २,४१५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दर ३.१० टक्के आहे. मृतांमध्ये मंडणगड तालुक्यात सर्वांत कमी ३९ रुग्णांचा, तर सर्वांत जास्त रत्नागिरी तालुक्यातील ८.३ रुग्णांचा समावेश आहे. दापोली तालुक्यात २१८ रुग्ण, खेडमध्ये २२१, गुहागरात १६७, चिपळुणात ४७३, संगमेश्वरात २१०, लांजात १२४ आणि राजापुरात १६० जणांचा मृत्यू झाला आहे.
३. जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गणेशोत्सवात ४० टक्क्यांपेक्षाही खाली आले होते. निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना चाचणीकडील लोकांचा कल कमी झाला आहे. लक्षणे नसतानाही बाधित अहवाल आला तर १५ दिवस क्वारंटाइन होण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. काही जण अँटिजन चाचणी करतात. पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यावर गेला, तर पुन्हा निर्बंध लागू होण्याची भीती आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.