कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:36 AM2021-08-14T04:36:55+5:302021-08-14T04:36:55+5:30
२. रत्नागिरी तालुक्यात इतर ठिकाणी कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत वाटद खंडाळा याण परिसरात ...
२. रत्नागिरी तालुक्यात इतर ठिकाणी कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत वाटद खंडाळा याण परिसरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. वाटद येथे शिवसेनेमार्फत आयसोलेशन सेंटर उभारले होते. त्यात रुग्णांची सुसज्ज सेवा केली जात होती. यात प्रामुख्याने शिवसेना विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर, विभाग संघटक उदय माने, अजिम चिकटे, अप्पा धनावडे, माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, पंचायत समिती सभापती संजना माने, माजी सभापती मेघना पाष्टे यांचा सहभाग होता.
३. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित २०० पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी लोकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क घालणे तसेच सॅनिटायरचा वापर करणे आवश्यक आहे.