कोराेनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:37 AM2021-08-17T04:37:05+5:302021-08-17T04:37:05+5:30
२. रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे कोविड रुग्णांची संख्या पूर्णत: कमी झालेली नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खालगाव जाकादेवी येथे कोविड ...
२. रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे कोविड रुग्णांची संख्या पूर्णत: कमी झालेली नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खालगाव जाकादेवी येथे कोविड केअर सेंटर व्हावे, अशी येथील अनेक ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली खालगाव येथे नव्याने विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे.
३. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असला तरी नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर यासह आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती सर्व जबाबदारी घ्यावी. गर्दीत जाणे टाळावे, गर्दी होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करू नये आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, कोणाला काही लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.