तपासणीस विराेध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : मारुती जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:47+5:302021-06-22T04:21:47+5:30

साखरपा : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सर्वांनीच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन कोंडगाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी ...

File charges against those who oppose the investigation: Maruti Jagtap | तपासणीस विराेध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : मारुती जगताप

तपासणीस विराेध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : मारुती जगताप

Next

साखरपा : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सर्वांनीच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन कोंडगाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. काेंडगावमध्ये १०० टक्के चाचणी झाली पाहिजे. जे विराेध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी पोलिसांना दिले.

कोंडगाव ग्रामपंचायत कार्यालयात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी भेट देऊन कोंडगावमधील कोरोना परिस्थितीबाबत माहिती घेतली. कोरोनारूपी राक्षसाला कसे नेस्तनाबूत करता येईल यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुकानांचे शटर बंद असले तरी पाठच्या दाराने उघडे असते, अशी माहिती या बैठकीत पोलीस निरीक्षकांना देण्यात आली. उद्यापासून अशी दुकाने उघडी असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी पोलिसांना दिले.

यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर, कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये, पोलीस पाटील मारुती शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट आदाते, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गांधी, ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे अमित केतकर, पोलीस कॉन्स्टेबल वैभव नटे, राजन किर, संतोष पोटफोडे, ग्रामसेवक राजेश इंदूलकर, तलाठी आत्माराम मुरकुटे उपस्थित होते.

Web Title: File charges against those who oppose the investigation: Maruti Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.