कामगाराच्या मृत्यूप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:08+5:302021-04-28T04:34:08+5:30
रत्नागिरी : शहरातील मुरूगवाडा येथे पाळीव रॉटव्हिलर श्वानाच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी मालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात ...
रत्नागिरी : शहरातील मुरूगवाडा येथे पाळीव रॉटव्हिलर श्वानाच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी मालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली होती.
संजय ऊर्फ बाळा कृष्णा मयेकर (५७, रा. मुरूगवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या मालकाचे नाव आहे. या हल्ल्यात दिवाकर एकनाथ पाटील (५५, रा. पावस, रत्नागिरी) या कामगाराचा मृत्यू झाला होता. दिवाकर पाटील हे बाळा मयेकर याच्या पाळीव प्राण्यांची देखभाल करण्याचे काम करत हाेते. काही दिवसांसाठी ते सुट्टीवर जाणार हाेते. त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी ते दुसऱ्या एका व्यक्तीला आपले काम समजावून सांगत हाेते. श्वानाजवळ काम करत असताना रॉटव्हिलर श्वानाने त्यांच्या मानेला व हाताला चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे पाळीव प्राण्यांबाबत हयगय तसेच निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सोमवारी रात्री दाखल करण्यात आला. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले करीत आहेत.