मास्क न लावल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:20 AM2021-07-09T04:20:55+5:302021-07-09T04:20:55+5:30
रत्नागिरी : जयगड ते खंडाळा बायपास मार्गावरील चाफेरी फाटा येथे मास्क न लावता फिरणाऱ्या तरुणावर जयगड पोलीस स्थानकात गुन्हा ...
रत्नागिरी : जयगड ते खंडाळा बायपास मार्गावरील चाफेरी फाटा येथे मास्क न लावता फिरणाऱ्या तरुणावर जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्याचा सुमारास करण्यात आली.
जयगड पाेलिसांनी जितेश सहदेव चौगुले (३२, रा. चाफेरी गवळीवाडा, रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, तरीही अनेकजण मास्क न लावताच सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पाेलिसांकडून तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तरीही नागरिकांकडून आदेशाचे उल्लंघन हाेताना दिसत आहे.