शाळा भरवताय, दुरुस्तीचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:22 AM2021-07-21T04:22:01+5:302021-07-21T04:22:01+5:30
अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या दाेन वर्षांत काेराेनामुळे शिक्षणाचा पुरता खेळखंडाेबाच सुरू आहे. शाळा बंद ...
अरुण आडिवरेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या दाेन वर्षांत काेराेनामुळे शिक्षणाचा पुरता खेळखंडाेबाच सुरू आहे. शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरविताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय नुकसान टाळण्यासाठी काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा भरविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, शाळा सुरू करताना नादुरुस्त शाळांचा धाेका कायम आहे. जिल्ह्यातील २६१५ शाळांपैकी ८८९ शाळा नादुरुस्त असून, शाळा सुरू केल्यानंतर नादुरुस्त शाळांची टांगती तलवार विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही राहणार आहे.
जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांची समस्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची डाेकेदुखी ठरलेली आहे. शाळांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात येत असला तरी तुटपुंजी मदत मिळत असल्याने त्यात किती शाळांची दुरुस्ती करायची, हा प्रश्नच आहे. गतवर्षी शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला ६ काेटी २४ लाखांची गरज असताना जिल्हा वार्षिक नियाेजनमधून केवळ ४ काेटी १६ लाख ८४ हजार एवढीच रक्कम प्राप्त झाली हाेती. निधीची ही समस्या अजूनही कायम आहे.
जिल्ह्यात काेसळणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका शाळांना बसत असून, त्यामुळे शाळा नादुरुस्त हाेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच ‘ताैक्ते’ चक्रीवादळामुळे नादुरुस्त शाळांमध्ये भर पडली आहे. नादुरुस्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणार कसे, असा प्रश्न आता उपस्थित हाेत आहे. गतवर्षीपासून काेराेनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला काेणताच धाेका पाेहाेचला नाही. या काळात मंडणगडसारख्या भागातील एक शाळा जमीनदाेस्त झाली, सुदैवाने शाळा बंद असल्याने अनर्थ टळला.
आता काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेऊ लागल्याने पुन्हा शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या शाळा सुरू करताना नादुरुस्त शाळांचा प्रश्न तसाच आहे. जिल्ह्यात सध्या ८८९ शाळा नादुरुस्त असून, त्यातील सर्वाधिक शाळा रत्नागिरी तालुक्यात आहेत. या शाळांची दुरुस्ती झाल्याशिवाय शाळा सुरू करणे धाेक्याचे ठरणार आहे.
--------------------------काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला पाहिजे. गावाने ठरविले तर शाळा सुरू हाेऊ शकते. ‘ताैक्ते’ वादळामुळे शाळांचे माेठे नुकसान झाले आहे. समग्र शिक्षा अभियानातून शाळांची दुरुस्ती तातडीने करण्याचा प्रयत्न आहे. ‘ताैक्ते’ वादळातील शाळांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र ८ काेटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. केवळ दीड काेटीच मिळाले आहेत.
- चंद्रकांत मणचेकर, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद
------------------------सध्या माध्यमिकच्या ५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राजापूर ४ व संगमेश्वरातील १ शाळा आहे. अजूनही प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत काेणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
- निशादेवी वाघमाेडे, शिक्षणाधिकारी