बांधकाम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:19+5:302021-07-15T04:22:19+5:30
पूरग्रस्त भागाची पाहणी आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदीला पूर आला असून, माखजन बाजारपेठेमध्ये पाणी शिरले आहे. बाजारपेठेत ...
पूरग्रस्त भागाची पाहणी
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदीला पूर आला असून, माखजन बाजारपेठेमध्ये पाणी शिरले आहे. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याचे कळताच आमदार शेखर निकम यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांची भेट घेतली.
विजय फंड यांची निवड
दापोली : अखिल भारतीय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या दापोली कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी दापोलीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
खत शिल्लक
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील भात, नाचणी पिकासाठी आवश्यक असलेले खत मागणीनुसार उपलब्ध झाले आहे. तरीही खत विक्रीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. तालुक्याला ८०५.१३पैकी ५७१.७४ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून, तालुक्यात २३३.२६ मेट्रिक टन खत शिल्लक राहिले आहे.
शनिवारी आरोग्य तपासणी
दापोली : डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रूग्णालयातर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोज करण्यात आले आहे. या शस्त्रक्रिया पूर्वतपासणीसाठी दापोली येथे शनिवार, दि. १७ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे.
काॅजवे खचला
दापोली : तालुक्यात मुसळधार पावसामुळे ऊन्हवरे व वाघर गावांना जोडणाऱ्या काॅजवेचा भराव वाहून गेला आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वावघर भागणेवाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.
ॲक्वाकल्चर सर्टिफिकेट कोर्स
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात ॲक्वाकल्चर सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आला आहे. या काेर्सचा कालावधी सहा महिने असून, बारावी उत्तीर्ण तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी या कोर्ससाठी पात्र असतील.
प्रवेश प्रक्रिया सुरू
चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल काॅलेज, काेंढे येथे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पालकांचा व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गरूड यांचा सत्कार
खेड : उपजिल्हा रूग्णालय, कळंबणीचे अधीक्षक डाॅ. संभाजी गरूड हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. चिपळूण अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सतीशआप्पा खेडेकर, डाॅ. निशीकांत सावंत, कादवडच्या डाॅ. नम्रता सावंत, पत्रकार डाॅ. सुनील सावंत यावेळी उपस्थित होते.
शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ
गुहागर : तालुक्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. विविध शासकीय कार्यालयांंना भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात येत आहेत.