बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:02+5:302021-09-07T04:38:02+5:30
गुहागर : तालुक्यातील वाडदई येथील संगीता भिकाजी बाईत यांची गाय व बैल बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले होते. त्यांना नुकसानभरपाईचा ...
गुहागर : तालुक्यातील वाडदई येथील संगीता भिकाजी बाईत यांची गाय व बैल बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले होते. त्यांना नुकसानभरपाईचा १७,६२५ रुपयांचा धनादेश जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला.
वाडदई येथील या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी म्हणून नेत्रा ठाकूर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली हाेती. त्यावेळी नुकसानाचा पंचनामा करण्यास सांगितले होते. याबाबत नेत्रा ठाकूर यांनी पाठपुरावा केल्यामुळे वन विभाग रत्नागिरी - चिपळूण परिमंडळ, गुहागरतर्फे नुकसानभरपाई मंजूर झाली. या नुकसानभरपाईपोटी १७,६२५ रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी वन विभागाचे अधिकारी वनपाल संतोष परशेट्टे, वनरक्षक वाय. एस. सावर्डेकर, ए. बी. मांडवकर, एस. बी. दुडुंगे, माजी सरपंच नवनीत ठाकूर, सुनील जोशी, विनायक कांबळे, संदीप भेकरे उपस्थित होते.