केवळ १७ दिवसांत वसूल केला २३ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:55+5:302021-05-05T04:50:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षित व शिस्तीत व्हावी यासाठी जिल्हा वाहतूक विभागाकडून लाॅकडाऊनच्या काळात वाहतुकीच्या विविध ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षित व शिस्तीत व्हावी यासाठी जिल्हा वाहतूक विभागाकडून लाॅकडाऊनच्या काळात वाहतुकीच्या विविध नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या १७ दिवसांत पाेलिसांनी ८,२४० जणांकडून २३,०३,३०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.
लाॅकडाऊनच्या काळातही हेल्मेटचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच लाॅकडाऊनमध्ये विनाकारण फिरणारे, अत्यावश्यक सेवेमध्ये असलेले विनाहेल्मेट फिरताना आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे. १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत विनाहेल्मेट ९६२ केसेस तर विनासीटबेल्ट ७०६ केसेस करण्यात आल्या आहेत. विनाहेल्मेट ४ लाख ८१ हजार, तर विनासीटबेल्ट १ लाख ४१ हजार २०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार आहे.
............................
प्रशासनाने कोरोनाकाळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन पाळावे. अत्यावश्यक काराणाशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर जाताना वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहतूक पोलिसांचे सर्व नागरिकांवर बारीक लक्ष आहे.
- शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक, रत्नागिरी