फिनोलेक्स ॲकॅडमीला ‘एक्सलन्ट इंडस्ट्री इंटरफेस ॲवॉर्ड २०२१’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:35+5:302021-05-14T04:30:35+5:30
रत्नागिरी : सीएएमआय असोसिएशन ऑल इंडिया आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन समिट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘१६ व्या ...
रत्नागिरी : सीएएमआय असोसिएशन ऑल इंडिया आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन समिट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘१६ व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि नॅशनल एज्युकेशन ॲवॉर्ड’मध्ये फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘एक्सलन्ट इंडस्ट्री इंटरफेस ॲवॉर्ड २०२१’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ डब्लूएसआयएसफोरम- अ युनाइटेड नेशन इव्हेंट या कार्यक्रमात जिनिव्हा स्वीत्झर्लंड येथे पार पडला़
हा पुरस्कार फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ५०० हून अधिक संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये एकाच छताखाली आली होती. हा समारंभ जगभरातील सोशल मीडिया आणि न्यूज साइट्सच्या विविध डिजिटल लँडस्केप्सवर सादर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला संजय धोत्रे (युनियन एम.ओ.एस. फॉर एज्युकेशन, कॉम्युनिकेशन अँड इलेट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, भारत सरकार), डॉ. मालकॉम जॉन्सन (डेप्युटी सेक्रेटरी जनरल, आय टी यु जिनिव्हा स्वीत्झर्लंड), डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे (चेअरमन, ए.आय.सी.टी.ई, मिनिस्ट्री ऑफ एच आर डी, इंडिया), डॉ. अंतरिक्ष जोहरी (डायरेक्टर - आय टी अँड प्रोजेक्ट अँड चीफ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी ऑफिसर, सी.बी.एस.इ मिनिस्ट्री ऑफ एच आर डी, इंडिया), डॉ. पंकज मित्तल (सेक्रेटरी जनरल - असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी), डॉ. शिवाजीराव कदम (चॅन्सलर, भारती विद्यापीठ पुणे), प्रो. एन. के. गोयल (प्रेसिडेन्ट, सीएएमआय असोसिएशन ऑल इंडिया अँड नॅशनल टेक्निकल एज्युकेशन एमपॉवरमेन्ट कमिटी ए.आय.सी.टी.ई) उपस्थित होते.
या यशाबद्दल फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्षा अरुणा कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.