चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 02:05 PM2022-03-30T14:05:05+5:302022-03-30T14:11:50+5:30

भीषण आगीचा सामना करत अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली.

Fire breaks out on third floor flat in Chiplun, No casualties were reported by the fire brigade | चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली

चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली

Next

चिपळूण : शहरातील कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सदनिकेला काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीने अक्षरशः रौद्र रुप धारण केले. भीषण आगीचा सामना करत अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली.

कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर सय्यद यांच्या सदनिकेत अनंत सानप कुटुंबीय भाड्याने राहतात. काल, मंगळवारी रात्री अचानक एसीजवळ असलेल्या स्वीज जवळ शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संबंधित कुटुंब आगीत अडकून पडले होते. त्यांनी आरडाओरडा करताच शेजाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र घराचा मुख्य दरवाजा बंद होता.

अखेर मुख्य दरवाजा तोडण्यात आला. त्याचवेळी माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानानी घटनास्थळी दाखल होत तत्काळ आग नियंत्रणात आणली. त्यानंतर आतमध्ये अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले. यावेळी आग विझविण्यासाठी देवदास गावडे, अग्निशमन बंब चालक अभय गांधी, मनोज फरांदे, फायरमन संजय पवार, अमोल वीर, प्रतिक घेवडेकर, हर्ष कांबळी, सौरभ मोहिते यांनी प्रयत्न केले.

ऑर्चीड या चार मजली इमारतीत जाण्यासाठी विस्तीर्ण रस्ता असल्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत अग्निशमनचा पाईप नेणे शक्य झाले. त्यामुळे अनर्थ टळला. त्यामुळे शहरातील अन्य बांधकाम व्यावसायिकांनीही रस्त्याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.    - शशिकांत मोदी, माजी नगरसेवक, चिपळूण.

Web Title: Fire breaks out on third floor flat in Chiplun, No casualties were reported by the fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.