खेडात कृषी विभागाच्या नर्सरीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 03:40 PM2021-03-30T15:40:28+5:302021-03-30T15:42:20+5:30

Fire Ratnagiri- खेड तालुक्यातील भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधनाने ही आग वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे आंब्याची शेकडो कलमे या आगीपासून बचावली.

Fire at the Department of Agriculture nursery in the village | खेडात कृषी विभागाच्या नर्सरीला आग

खेडात कृषी विभागाच्या नर्सरीला आग

Next
ठळक मुद्देखेडात कृषी विभागाच्या नर्सरीला आगआगीपासून बचावली आंब्याची शेकडो कलमे

खेड : तालुक्यातील भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधनाने ही आग वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे आंब्याची शेकडो कलमे या आगीपासून बचावली.

भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला आग लागल्याचे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यावेळी खेडमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या जितेश कोळी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिली. नगराध्यक्ष खेडेकर यांनी तत्काळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले.

नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. कृषी विभागाच्या या नर्सरीत आंबा, काजू, नारळ, चिकू आदींची मोठ्या प्रमाणात रोपे आहेत.

नर्सरीला लागलेल्या आगीच्या धुराने कार्यालयात मार्चअखेर म्हणून सुट्टी असूनही कामकाजात व्यस्त असणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी नर्सरीकडे जाऊन आग विझविण्यासाठी मदत केली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आले नसते तर मात्र कृषी विभागाच्या नर्सरीतील सर्व झाडे जळून खाक झाली असती.

Web Title: Fire at the Department of Agriculture nursery in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.