जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:03 PM2021-01-08T14:03:13+5:302021-01-08T14:04:20+5:30
Jaitapur atomic energy plant Fire Ratnagiri- राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने आग लागल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. संपूर्ण प्रकल्प परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. आगीची माहिती मिळताच नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ही आग विझल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
राजापूर : तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने आग लागल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. संपूर्ण प्रकल्प परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. आगीची माहिती मिळताच नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ही आग विझल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्याने परिसरातील गवताला आग लागली होती. मात्र, तेथील सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखत ही आग तत्काळ विझवली होती. मात्र, रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने पुन्हा आग लागल्याने सगळ्यांचीच धावपळ उडाली. अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरातच ही आग लागल्याने धावाधाव सुरू झाली. आगीचा भडका अधिक उडाल्याने परिसरात धुराचे लोळ पसरले होते.
या आगीची माहिती मिळताच नाटे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. त्याचवेळी अग्निशमन बंबही बोलावण्यात आला होता. दरम्यान, सायंकाळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ही आग आटोक्यात आली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
शॉर्टसर्किटमुळे आग ?
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात गेले दोन दिवस स्पार्किंग होत असल्याचे माडबन येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यातूनच शॉर्टसर्किट होऊन ही आग आगल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील दुर्घटना टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.