रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटरला आग, कोट्यवधींची हानी  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 09:42 AM2020-03-08T09:42:21+5:302020-03-08T09:43:01+5:30

रत्नागिरीतील मारुतीमंदिर नजीकच डॉ. निनाद नाफडे आणि नीलेश नाफडे यांचे निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटर आहे.

Fire in Nishkarsh Diagnostic Center in Ratnagiri BKP | रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटरला आग, कोट्यवधींची हानी  

रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटरला आग, कोट्यवधींची हानी  

Next

रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटरला आग लागल्यामुळे आतील सर्व यंत्रणा जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे काही कोटींचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी ७.३० च्या दरम्यानची घटना घडली.

रत्नागिरीतील मारुतीमंदिर नजीकच डॉ. निनाद नाफडे आणि नीलेश नाफडे यांचे निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटर आहे. रविवारी सकाळी ७.३० सुमारास आतून धूर येत असल्याचे लक्षात आले. नगर परिषदेला कळवण्यात आल्यानंतर तत्काळ दोन बंब घटनास्थळी आले. मात्र तरीही आग आटोक्यात येत नसल्याने फिनोलेक्सच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आग नियंत्रणात आली.
डायग्नोस्टीक सेंटरची सर्व मशिनरी यात जळून गेल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Fire in Nishkarsh Diagnostic Center in Ratnagiri BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.