शाळेची पहिली घंटा आज घणघणणार
By admin | Published: June 14, 2016 09:25 PM2016-06-14T21:25:37+5:302016-06-15T00:03:56+5:30
किलबिलाट सुरु : नवागत विद्यार्थ्यांचे होणार स्वागत
रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. शासनाच्या नियमानुसार सर्वत्र एकाच दिवशी शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे शाळेची पहिली घंटा बुधवारी वाजणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागतदेखील केले जाणार आहे. जिल्ह्यात पहिलीच्या वर्गात एकूण ११,६७८ विद्यार्थी दाखल होणार आहेत.
जिल्ह्यात ३,३३३ प्राथमिक, तर ३९२ माध्यमिक शाळा आहेत. सर्व शाळांचे शैक्षणिक कामकाज बुधवारपासून सुरु होणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार व अधिनियमानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी नियोजन केले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व परिसराची सजावट करून नवागतांचे स्वागत करण्यात येणार आहे. सवाद्य मिरवणूकही काढली जाणार असून, शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.
गावातून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पदाधिकारी, युवक, ज्येष्ठ नागरिक यांनाही यात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. १०० टक्के पटनोंदणी, उपस्थिती, शाळा बाह्य मुले याबाबत घोषणा देण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
तालुकामुलेमुलीएकूण
मंडणगड२६९२५३५२२
दापोली७१३६४०१३५३
खेड६०९५४७११५६
चिपळूण७४८६९६१४४४
गुहागर५८६४८७१०७३
संगमेश्वर६६६७१७१३८३
रत्नागिरी१३५६१२४४२६००
लांजा४७५३७५८५०
राजापूर६८३६१४१२९७
एकूण६१०५५५७३११,६७८