हर्णै शाळेतील पहिलीच्या वर्गाच्या पटाने पूर्ण केले शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:22+5:302021-08-20T04:35:22+5:30
दापाेली : एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. परंतु, दापाेली तालुक्यातील जिल्हा परिषद हर्णै नं. १ शाळेचा ...
दापाेली : एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. परंतु, दापाेली तालुक्यातील जिल्हा परिषद हर्णै नं. १ शाळेचा पट मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. या शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पटाने शतक पूर्ण केले आहे.
सन २०२१/२२ या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात चक्क १०० नवीन विद्यार्थी दाखल झाले. शाळेत पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग असल्याने आणि पहिलीपासून उत्तम शिक्षण मिळत असल्याने पालकांचा हर्णै नं. १ शाळेकडे ओढा वाढला आहे. या पटवाढीसाठी केंद्रप्रमुख परकार, मुख्याध्यापक रुके तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर राणे, उपाध्यक्ष शेखर विलणकर आणि सर्व समिती सदस्य, सर्व शिक्षक, वर्ग शिक्षक जयंत सुर्वे, वैशाली भोई यांनी मेहनत घेतली.