mucormycosus Ratnagiri : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 03:26 PM2021-05-22T15:26:23+5:302021-05-22T15:28:29+5:30
mucormycosus Ratnagiri : गेले २५ दिवस कामथे उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तालुक्यातील नायशी येथील ३५ वर्षीय कोरोनाबाधित व म्युकरमायकोसिसचा आजार जडलेल्या रुग्णांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा पहिला बळी ठरला आहे.
चिपळूण : गेले २५ दिवस कामथे उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तालुक्यातील नायशी येथील ३५ वर्षीय कोरोनाबाधित व म्युकरमायकोसिसचा आजार जडलेल्या रुग्णांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा पहिला बळी ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशातच त्यांना म्युकरमायकोसिसचा त्रास झाला. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अशातच शुक्रवारी रात्री उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी नायशी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते खासगी संस्थेत चालक म्हणून काम करीत होते. गेली १५ वर्षे या संस्थेत कार्यरत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षीय मुलगा, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.