एलईडीविरोधात मच्छीमार आक्रमक, दापोलीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:25 PM2020-01-17T14:25:28+5:302020-01-17T14:28:11+5:30

पारंपरिक मच्छीमार एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारीविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. यामुळे कोकणात पुन्हा एकदा पारंपरिक विरुद्ध तांत्रिक मच्छीमार असा संघर्ष पेटणार आहे.

Fishermen aggressive against LED, meeting in Dapoli | एलईडीविरोधात मच्छीमार आक्रमक, दापोलीत बैठक

एलईडीविरोधात मच्छीमार आक्रमक, दापोलीत बैठक

Next
ठळक मुद्देएलईडीविरोधात मच्छीमार आक्रमक, दापोलीत बैठकतीनही जिल्ह्यातील समन्वय समितीत चर्चा

दापोली : पारंपरिक मच्छीमार एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारीविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. यामुळे कोकणात पुन्हा एकदा पारंपरिक विरुद्ध तांत्रिक मच्छीमार असा संघर्ष पेटणार आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीनही जिल्ह्यातील समन्वय समितीची बैठक दापोलीतील जालगाव खारवी भवन येथे पार पडली. या बैठकीत शासनाविरोधात आक्रमक होऊन २६ जानेवारी रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तांत्रिक मासेमारीने कोकणातील पारंपरिक मच्छीमार चांगलेच बेजार झाले आहेत. एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीने पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तांत्रिक मासेमारीला बंदी असूनही मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमार आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

दाभोळ खाडी मच्छीमार संघटना व हर्णै बंदर कमिटी यांच्यातर्फे एलईडी लाईटने होणाऱ्या अनधिकृत मासेमारीबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीनही जिल्ह्यातील प्रमुख मच्छीमार प्रतिनिधींची संयुक्त बैठक जालगाव येथील खारवी भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारीविरोधात उपस्थितांनी आपल्या भावना आक्रमकपणे मांडल्या. गेली दोन-तीन वर्ष समुद्रात राजरोसपणे एलईडी लाईटद्वारे अनधिकृत पर्सनेट मासेमारी सुरु असल्याने मत्स्यसंपत्ती संपुष्टात आली आहे. त्या

मुळे पारंपरिक मच्छिमारांना मासे मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे देशाला परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय चांगलाच संकटात सापडला आहे.

पारंपरिक मच्छिमारांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. याचवेळी एलईडी लाईटद्वारे बेकायदेशीर मासेमारी करून समुद्रातील साठे संपुष्टात आणले जात आहेत. या बेकायदेशीर मासेमारीला काही अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे.

त्यांच्याच आशीर्वादाने राजरोसपणे एलईडीद्वारे मासेमारी सुरू असल्याचे मच्छिमारांमधून सांगितले जात आहे. शासनाच्या १९८१च्या मासेमारी कायद्यानुसार मासेमारीच्या हद्दी ठरवून दिल्या आहेत. मात्र, असे असतानाही समुद्रात सरसकट मासेमारी केली जात आहे.
 

Web Title: Fishermen aggressive against LED, meeting in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.