रत्नागिरीतील मिऱ्या येथे मासेमारी नौका बुडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:14 PM2019-09-26T12:14:47+5:302019-09-26T12:21:53+5:30
मिऱ्या रत्नागिरी येथील नार्वेकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन मासेमारी नौका मिऱ्यासमोर बुडाली असल्याची माहिती मिळत आहे.
रत्नागिरी - मिऱ्या रत्नागिरी येथील नार्वेकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन मासेमारी नौका बुधवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास मिऱ्यासमोर बुडाली असल्याची माहिती मिळत आहे.
नौकेच्या जाळ्यात सुमारे ७०० जाळी (सुमारे एकवीस टन) मासळी सापडली होती. जाळ्यातून नौकेवर क्षमतेपेक्षा जास्त मासळी घेतल्याने नौकेत पाणी शिरले आणि नौका बुडाली. नौकेतील सर्व १२ ते १४ मच्छिमारांना मोंडकर यांच्या पर्ससीन नौकेने आपल्या नौकेवर घेऊन वाचवले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्या मिनी पर्ससीन नौकांना चार-पाच दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात छोटे मासे मिळत आहेत. फिश मिल कंपन्या ही मासळी प्रति जाळी ४५० ते ४७५ रुपये दराने खरेदी करत आहे.
पर्ससीन परवाने नसलेल्या सुमारे ४०० मिनी पर्ससीन नौका किनाऱ्यालगत राजरोस मासेमारी करत आहेत. या आठवड्यात किनार्यावर मासेमारी करणाऱ्या दोन मिनी पर्ससीन बुडाल्या सुदैवाने या घटनेत मनुष्यहानी झालेली नाही. मात्र बेकायदा पर्ससीन मासेमारी थांबवण्यासाठी मत्स्य खात्याचे अधिकारी आणि संबंधित परवाना अधिकारी कशाची वाट बघत आहेत असा प्रश्न मच्छीमारांना पडला आहे.