१ जूनपासून मासेमारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:18+5:302021-05-08T04:33:18+5:30
रत्नागिरी : मत्स्य विभागाकडून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी जाहीर करण्यात आला असून, १ जून २०२१ पासून मासेमारीला बंदी घालण्यात ...
रत्नागिरी : मत्स्य विभागाकडून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी जाहीर करण्यात आला असून, १ जून २०२१ पासून मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे़ ही बंदी ३१ जुलै २०२१ पर्यंत ६१ दिवसांची राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे़
पावसाळ्याच्या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येते़ त्यानुसार १ जूनपासून मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे़ मासेमारी नौका मालक व सर्व मच्छिमार यांनी मासेमारीला गेलेल्या नाैका १ जून २०२१ पूर्वी माघारी आणाव्यात़ त्यानंतर १ जून २०२१ नंतर कोणत्याही परिस्थतीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही़ मासेमारीसाठी गेलेल्या नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कारवाईस पात्र राहतील. त्यामुळे आपल्या संस्थेतील सर्व संबंधित नौका ३१ मे २०२१ वा तत्पूर्वी बंदरात पोहोचतील याबाबत नौका मालकांना सूचना करण्याची जबाबदारी संस्थेची राहणार आहे. तसेच मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक नौकाद्वारे व कोणत्याही अवैध मासेमारी होणार नाही, तसेच कोणतीही यांत्रिक नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे रत्नागिरीचे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) यांनी कळविले आहे.