फिटनेस फंडा : काेविड १९ च्या संसर्गात मुलांचे आराेग्य जपण्यासाठी... भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:03+5:302021-07-11T04:22:03+5:30

सौम्य कोविड लक्षणे याची घरच्या घरी ट्रिटमेंट करता येते. कारण त्याच्यासाठी घर हेच एक शाश्वत श्वासाच्या मायेच्या उबेचं ठिकाण ...

Fitness Fund: To take care of the health of children infected with Cavid 19 ... Part 2 | फिटनेस फंडा : काेविड १९ च्या संसर्गात मुलांचे आराेग्य जपण्यासाठी... भाग २

फिटनेस फंडा : काेविड १९ च्या संसर्गात मुलांचे आराेग्य जपण्यासाठी... भाग २

Next

सौम्य कोविड लक्षणे याची घरच्या घरी ट्रिटमेंट करता येते. कारण त्याच्यासाठी घर हेच एक शाश्वत श्वासाच्या मायेच्या उबेचं ठिकाण असते. म्हणून मुलांना जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा गरम पाण्याच्या गुळण्या करायला द्याव्यात. १४ दिवस त्याला विलगीकरणात घरी ठेवावे. अर्थात शक्यतो या संसर्ग काळात मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शाळा म्हणूनच बंद आहेत. माझ्या मते एक वर्षे अजून सुरूच करू नये. जिथे शक्य असेल, तिथे तिथे ऑनलाईन शिक्षण असावे. होमवर्क बुक आणि स्वाध्याय पुस्तिका असाव्यात. कारण अगोदरच संपूर्ण जग या संसर्गामुळे त्रस्त आहेत. पुन्हा त्यात मुलांना जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्याला पौष्टिक आहार द्यावा. भरपूर पाणी पिण्यास उद्युक्त करावे. मूल पाणी प्यायला तयार नसते. लहान मुलांचे ठीक आहे. त्यांना चमच्याने भरवता येतं. पण बाकीची मुलं साधारण २ वर्षे झालेली पितीलच असे नाही. साधारण सरबत किंवा ज्यूस यामधूनही त्याला मुबलक पाणी मिळेल. सर्व साधारणत: मूल दूध पित नाही. फळे खात नाहीत. पण त्याला आई बरोबर भरवू शकते. म्हणून तो भरपूर पाणी घेईल. याकडे लक्ष पुरवावे. दर दिवशी डॉक्टरांना फोन करून कळवावे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या तापमानाची नोंद ठेवावी. त्यांना कळवावी. म्हणजे डॉक्टरांना पुढचं पाऊल उचलता येईल. ग्रामीण भागात आशा वर्कर्स यात मददगार ठरतात. पालकांनी नाडीची गती, ऑक्सिजन आणि श्वसनाचा वेग, लघवीचे प्रमाण हे सर्व डॉक्टर, त्यांच्या नर्सेस किंवा आशा वर्क र्स यांच्याकडून शिकून घ्यावे. मात्र तीन दिवसात काहीच फरक न पडल्यास किंवा धोक्याची लक्षणे (दिनांक ४ जुलैच्या लेखाप्रमाणे) दिसल्यास त्यालाच RED FLAGS म्हणतात. लगेच डॉक्टरी सल्ल्याने बाळ कोविड रुग्णालयात भरती करावे.

काही मुलांना इतर आजार असतील उदा. ब्लड प्रेशर, हृदयविकार, डायबेटीस, प्रतिकारशक्ती कमी असेल, फुप्फुसाचे आजार, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, लठ्ठपणा यासारख्या आजारात कोविड १९ ची सौम्य लक्षणे असली तरीही डॉक्टरी सल्ल्याने बाळ कोविड रुग्णालयात भरती करणे आवश्यकच आहे. कारण तिथे सर्व ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स इत्यादी सोय असते. २४ तास अत्यावश्यक निरीक्षणाखाली असतो. त्यामुळे मूल आरोग्यदृष्ट्या सुरक्षित होतं. मात्र योग्य अशी व्यवस्था असूनही पालकांनी घाबरून न जाता या सुरक्षिततेच्या बाळ कोविड रुग्णालयाचा आधार घ्यावाच.

साधा तापही मुलांचा कोविड संसर्ग असू शकतो. म्हणून वेळेत निदान महत्त्वाचे आहे. त्याची म्हणूनच टेस्ट करून घ्या. मुलांना आजी आजोबांपासून दूर ठेवा. ॲन्टिजन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्टला घाबरू नये. कारण ही आपल्या मुलांना आजारातून बरे करण्यासाठी जे महत्त्वाचे उपचार करायचे असतात, त्यात आधारभूत ठरते. अर्थात ही वेळ येऊच नये, म्हणून आपण सर्व जण खबरदारीचे नियम पाळू या... सुरक्षित राहू या... आपल्या मुलांनाही सुरक्षा प्रदान करूया...!

- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी

Web Title: Fitness Fund: To take care of the health of children infected with Cavid 19 ... Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.