फिटनेस फंडा : काेराेनाला हरवूच - वुई लव्ह अवर जिंदगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:37+5:302021-06-20T04:21:37+5:30

कोरोनाला हरवूच : वुई लव्ह अवर जिंदगी...! (भाग ४) या कोविड - १९च्या दीड वर्षाच्या काळात, जगभर वैद्यक विज्ञान ...

Fitness Funda: Defeat Kareena - We Love Our Life | फिटनेस फंडा : काेराेनाला हरवूच - वुई लव्ह अवर जिंदगी

फिटनेस फंडा : काेराेनाला हरवूच - वुई लव्ह अवर जिंदगी

Next

कोरोनाला हरवूच : वुई लव्ह अवर जिंदगी...! (भाग ४)

या कोविड - १९च्या दीड वर्षाच्या काळात, जगभर वैद्यक विज्ञान आणि संशोधनाने जसे सामूहिक प्रतिबंधक पण व्यक्तीपासून सुरु होऊन सामूहिक संरक्षणाचा मुलभूत मार्ग जो सर्वांना पाठ झाला आहे. मास्क वापर, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवा आणि करवून घ्या लसीकरण हा उपाय सांगितला आहे. त्यामुळेच बऱ्यापैकी जग आणि देश या महामारीतून संरक्षित आहे. म्हणजे ‘व्यक्ती ते समष्ठी’ असं हे तंत्र, अगदी याच तंत्रासारखं अजून भारतीय परंपरेतील पतंजलीच्या सुत्रांनी सिद्ध केलेला योग आणि योगा उपचार यानेही जगाला तारलं आहे. ह्या योगाकडे जागतिक मान्यतेचं शिक्कामोर्तब जागतिक संघटनेने केले. ‘२१ जून’ म्हणूनच ‘जागतिक योग दिवस’ ठरला. आपले भारतीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना याचं निर्विवाद श्रेय आहे. जगभर कोरोनाला हरवताना, प्रतिकारशक्ती शाबूत ठेवताना आहार आणि योग याचा उपचारक आणि उपकारक उपयोग सर्व जगाने आणि वैद्यक संशोधनाने मान्य केला आहे. कारण आपण आपल्या जीवनावर प्रेम करतो. दुसऱ्याच्या जीवनावरही प्रेम करतो आणि सर्वांच्या आरोग्यावरही प्रेम करतो. ‘योग सायंसेस’ ही वसुधैव कुटुम्बकम् याची प्रणाली आहे. योगा जीवनाच्या उत्कृष्टतेची हमी देतो.

या कोविड सॉर्स - २ च्या उपचारात फुफ्फुसाचं आरोग्य उत्तम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या संसर्गामुळे जनजीवनाच्या स्टाईलमध्ये जे असुरक्षित घटक आहेत, त्यामुळे मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम झाले आहेत. या सर्व घडलेल्या आणि घडून राहिलेल्या घटकांची पुन्हा मी उजळणी करणार नाही. मात्र, या योगांच्या नियमित साधनेमुळे, प्रॅक्टिसेसमुळे बरीच जनसंख्या तरली आहे, तरत आहे. कारण योगा श्वासावर आणि स्थिरतेच्या तंत्रावर भर देते. या स्थिरतेत हृदय, फुफ्फुस, रक्ताचे संचलन, स्नायूंची ताकद, मेंदूची क्षमता आणि अंत:स्थ ग्रंथींच्या बळकटीचं महत्त्व आहे. म्हणूनच ‘योग’ हा जीवनाचा ‘सिद्ध योग’ ठरला आहे. कारण योगासनांमुळे वैद्यकीय खर्चात कपात होते. त्याचंही कारण सहसा हृदयविकार आणि श्वसनाचे विकार आणि चिंता विकार यांची सरासरी घटते. वैद्यकीय खर्चात ४३ टक्के कपात होऊ शकते, असे मॅसेच्युसेटस रुग्णालयाचे डॉ. जेम्स ई स्टॉल यांचे संशोधन सांगते.

योगातील ध्यानधारणा आणि प्राणायामामुळे मेंदूतील रासायनिक संदेशवाहक असलेल्या ‘नोरोड्रेनलाईन’ या रसायनाची पातळी वाढते. त्यामुळे शरिरात अनेक सकारात्मक विधायक बदल घडून येतात, असे जर्नल ऑफ सायको फिजिओलॉजिकल’मध्ये डब्लीनच्या ट्रिनिटी कॉलेजच्या संशोधकांनी दावा केला आहे. हे असे सकारात्मक शारीरिक आणि मानसिक बदल प्रतिकारक्षमतेच्या सिस्टीमला मजबूत करतात. म्हणून योगा थेरपी कोविड सॉर्स - २ साठी अत्यंत पोषक ठरली आहे. म्हणून योगासने सर्वांनी आवर्जून करावीत.

आता आपण आपल्या अजून एक बरे होण्याच्या मार्गावर असतानाचा एक श्वासाचा व्यायाम करणार आहोत. विशेष म्हणजे हे सर्व योग प्रकारात येतात. ‘फिजिओथेरप्युटीक्स’मध्ये याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण ‘पर्स्ड - लिप - ब्रिथींग - व्यायाम’ करणार आहोत. यामुळे श्वासातील कार्बनडायऑक्साईड सॅच्युरेशन म्हणजेच श्वास घेऊन झाल्यावर जो वायू फुफ्फुसात साचतो. तो बाहेर काढून ताजा प्राणवायू आत घेण्याचा व्यायाम होय. यामुळे फुफ्फुसातील वायू कोशिका शुद्ध प्राणवायूने भरल्या जाते. साधारण दिवसातून ३ ते ५ वेळा करावे. यात आपण आता सरळ बसणार आहोत. नाकाने श्वास घेत आहोत, अर्थात हळुवारपणे. ४ ते ५ सेकंद आता आपण तो धरुन ठेवला आहे. आता आपण तोंडाचा गोल करुन उदा. वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्ती विझवताना जी तोंडाची गोलाकार कृती करतो, ती करणार आहोत. जास्तीत जास्त तोंडाच्या या गोलाकारातून श्वास सोडणार आहोत. एका विशिष्ठ पोझिशनला थांबणार आहोत. पुन्हा ही कृती करणार आहोत. हळुहळू शुद्ध हवा घेण्याची क्षमता वाढते. सॉर्स २ पासून मुक्ती मिळण्यात याची दमदार साथ मिळते, म्हणून बरे होतानाच्या मार्गावर व्यायाम कराच. आजारापासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधक उपाय सक्तीने अंमलात आणा आणि प्रतिकारशक्ती उत्तम राहो. यासाठी योग आणि आहार उत्तम ठेवा, कारण ‘वुई ऑल लव्ह अवर जिंदगी...!

- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी

Web Title: Fitness Funda: Defeat Kareena - We Love Our Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.