फिटनेस फंडा : खेळाडूंचा फिटनेस (SPORTS INJURIES) - खेळादरम्यानच्या दुखापती - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:32 AM2021-03-27T04:32:37+5:302021-03-27T04:32:37+5:30

जगाच्या पाठीवर मानवीय वाढ होताना आपण प्रत्येकाने एक गोष्ट नक्की अनुभवली आहे. ती म्हणजे, धडपडणं, उठणं आणि उभं राहणं. ...

Fitness Funda: SPORTS INJURIES - Injuries During Sports - Part 1 | फिटनेस फंडा : खेळाडूंचा फिटनेस (SPORTS INJURIES) - खेळादरम्यानच्या दुखापती - भाग १

फिटनेस फंडा : खेळाडूंचा फिटनेस (SPORTS INJURIES) - खेळादरम्यानच्या दुखापती - भाग १

Next

जगाच्या पाठीवर मानवीय वाढ होताना आपण प्रत्येकाने एक गोष्ट नक्की अनुभवली आहे. ती म्हणजे, धडपडणं, उठणं आणि उभं राहणं. अर्थात कुणालाच इजा होऊ नये, हे खेळातील तत्त्व असतं; पण कधीतरी, काहीतरी, कुठेतरी घडतं आणि खेळाडूला इजा होते. हाता-पायाला इजा होो हे नेहमीचेच आहे. त्यातून खेळाडू लगेच सावरतो. पण स्वत:ला इजा होऊ नये, दुसऱ्यालाही इजा होऊ नये, स्वत:लाही त्रास होऊ नये आणि दुसऱ्यालाही त्रास होऊ नये, या आदर्श खेळातील वेधक, आकर्षक, समर्पक गोष्टी असतात. तरीही इजा होतेच, अर्थात त्या घातक किंवा जीवघेण्या असू नयेत, यासाठी अलीकडे बऱ्याचशा संस्था काळजी घेतात. उदाहरण द्यायचे झाले तर अलीकडे प्रो कबड्डीच्या स्पर्धा विशिष्ट स्पंज किंवा इजा न होणाऱ्या प्ले बेडस्‌वर खेळविल्या जातात. मैदान इजा होऊ नये या दृष्टीने तयार केले जाते. तरीही इजा होतात. त्यालाच खेळादरम्यान होणाऱ्या दुखापती किंवा इजा किंवा स्पोर्टस् इन्ज्युरीज् (SPORTS INJURIES) असे म्हणतात.

सहसा एखादा जोरदार फटका एखाद्या सांध्यावर किंवा स्नायू समूहावर बसला तर जोराने कळ येते. स्नायू, सांधा, स्नायू समूह किंवा एखादा अवयव जायबंदी होतो. दुखावतो. एखाद्या वेळेस एखादा स्नायू गट एखाद्या खेळातील हिकमत किंवा कौशल्य आत्मसात करण्यास किंवा तेव्हढ्या क्षमता (CALIBER) पेलण्यास तयार नसतो, तेव्हाही दुखापतीला खेळाडूला सामोरे जावे लागते. थोडक्यात स्नायूला न पेलणारा धक्का सहन झाला नाही, तर खेळाडूला खेळातील दुखापतींना सामोरे जावे लागते. सुदैवाने बऱ्याच मैदानी खेळातील दुखापती जास्त सिरिअस नसतात. वेदनाशामक औषधे, सूज निवारक औषधे, काही वेळेस खरचटणे यासाठी खरचटलेली जखम स्वच्छ करणे यासाठी फर्स्ट एड बॉक्स कुठल्याही खेळाच्या मैदानावर आवश्यकच आहे. सराव करतानाही आवश्यक आहे. साधारणत: याची काळजी विविधांगी स्पर्धा भरविणाऱ्या संस्था घेत असतात. नसतील तर घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, व्यवस्था करावी.

सर्वसाधारणत: कुठलाही खेळाडू मग तो स्त्री असो की पुरुष त्यांना १) खांद्यात इजा पोहोचते. सहसा व्हॉलीबॉल, क्रिकेटमधील गोलंदाजी, हॉकी, गोळाफेक, थाळीफेक, कबड्डी किंवा जिथे झटक्याने हात पुढे किंवा गोलाकार करण्याची कृती करावयाची असते, तिथे ही इजा होते. त्याला रोटेटर कफ टेंडोनायटिस असे म्हणतात. सहसा खांद्यापेक्षा हात वर उंचावून खेळ करताना किंवा खूप वेळ खांद्यातून हालचाली करताना ही इजा पोहोचते, होते. २) सरव्हायकल (CERVICAL SPRIN) मानेच्या लिगामेंट यांना हलक्या स्वरूपाची इजा पोहोचते. खूप ताण दिला गेला तर मणके धरून ठेवणारे अनुबंध (LIGAMENTS) हलक्या स्वरूपात अर्धवटरीत्या फाटतात. (PARTIAL TEARING OF NECK LIGAMENTS) ३) टेनिस एल्बो (TENNIS ELBOW) थोडेसे किंचित कोपराखाली कोपराच्या बाहेरच्या बाजूला होतो. खूप जड वस्तू उचलणे, टेनिसमध्ये जोराचा फटका मारणे किंवा खूप ताण हातावर पडणे किंवा क्वचित कोपराचा सांधा आखडणे (LOCKING OF ELBOW JOINT) यामुळे होतो. ४) याच्या उलट गोल्फर्स एल्बो (GOLFERS ELBOW) हा कोपराच्या आतल्या बाजूस होतो. सहसा गोल्फ खेळणाऱ्यात हा आढळतो, म्हणून याला तसे नाव दिले आहे. ५) हॅमस्ट्रिंग पुल्स हे मांडीच्या मागच्या बाजूस होतो. अतिरिक्त ताण खेळताना याला कारणीभूत असतो. सहसा खेळ सुरू करण्यापूर्वी योग्य स्ट्रेचिंगचा व्यायाम केल्यास हा त्रास होत नाही.

(क्रमश:)

Web Title: Fitness Funda: SPORTS INJURIES - Injuries During Sports - Part 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.