चिपळुणातील पाच, तर गुहागरमधील चार गावांमध्ये कोरोना शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:25 AM2021-07-17T04:25:10+5:302021-07-17T04:25:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील पाच, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील पाच, तर गुहागरमधील चार गावांमध्ये कोरोनाचा साथीसारखा प्रसार झाला आहे. तसेच तालुक्यात हॉट स्पॉट गावांची संख्याही दहावर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याने तालुक्यात सद्यस्थितीत ८२० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी येथील प्रशासन व आरोग्य विभाग वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देत आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णसंख्येचा आलेख चढता राहिल्याने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी दहा गावे कोरोना हॉट स्पॉट म्हणून घोषित करून तेथे कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये गुहागर तालुक्यातील तळवली येथील चिंचवाडी, बौध्दवाडी, आगरवाडी, शिगवणवाडी, तर नागझरी येथील वरचीवाडी, मधलीवाडी, गवळीवाडी, खालचीवाडी, तसेच तालुक्यातील परचुरी खुर्द बौध्दवाडी, गांग्रई पूर्ण गाव, कापसाळ पूर्ण गाव, कळवंडे पूर्ण गाव, भिले पूर्ण गाव, कळंबस्ते पूर्ण गाव, रामपूर पूर्ण गाव, शहरातील पाग नाका रिक्षा स्टॉप सोहम अपार्टमेंट हॉट स्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
याशिवाय २२ पेक्षा रुग्ण असलेल्या व एखाद्या साथीप्रमाणे कोरोनाचा प्रसार झालेल्या गावांमध्ये चिपळूण सावर्डे विभागातील डेरवण फाटा, बि. के. एल रुग्णालय, बाजारपेठ, राम वसाहत, कुडप फाटा, कोष्टीवाडी, वहाळ फाटा, पिंपळ मोहल्ला, सुर्वेवाडी, बौध्दवाडी, काजारकोंड, उदयेगवाडी, कुंभारवाडी, अडेरकर मोहल्ला, भुवडवाडी, कासारवाडी, रोहिदासवाडी येथे ६० रुग्ण, खेर्डी येथील कातळवाडी, गुरववाडी, फाळकेवाडी, देऊळवाडी, बौध्दवाडी, नगर, कदमवाडी, भुरणवाडी, दातेवाडी, चिलेवाडी, खतातेवाडी, खालचीपेठ, दत्तवाडी, माळेवाडी, विकासवाडी, औद्योगिक वसाहत, वरची पेठ, मोहल्ला, शिगवणवाडी, शिवाजीनगर येथे ९४ रुग्ण, शिरगावात २२ रुग्ण, कौढरताम्हाणेत २५ रुग्ण व चिपळूण शहरातील ओझरवाडीत ३१ रुग्ण आहेत. तसेच गुहागर तालुक्यातील पिंपर वीरवाडी येथे ४२ रुग्ण, वाघांबे वणेवाडी, वरचीवाडी, निंबरेवाडी येथे ३३ रुग्ण, तर पांगारी येथील सडेवाडीत २७ रुग्ण व असगोली हुंबरवाडी, लिंगायतवाडी येथे ४१ रुग्ण आहेत.