चिपळुणात हिवतापाचे ५ रुग्ण आढळले

By admin | Published: November 14, 2014 12:20 AM2014-11-14T00:20:01+5:302014-11-14T00:20:19+5:30

चिपळूण : साथीचे कोणतेही आजार पसरु नयेत,

Five patients of malaria found in Chiplun | चिपळुणात हिवतापाचे ५ रुग्ण आढळले

चिपळुणात हिवतापाचे ५ रुग्ण आढळले

Next

चिपळूण : साथीचे कोणतेही आजार पसरु नयेत, यासाठी आरोग्य विभागातर्फे जानेवारी ते सप्टेंबरअखेर हिवताप रक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३५ हजार ३४५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये केवळ ५ हिवतापाचे रुग्ण आढळले. त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात आले. सध्या डेंग्यूसदृश साथ असल्याने या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातर्फे जानेवारी ते सप्टेंबरअखेर ताप येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ३५ हजार ३४५ रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. त्यापैकी केवळ ५ रुग्ण हिवतापाचे आढळले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
रामपूर येथे ४ हजार १५१ रुग्णांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये १ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह निघाला. खरवते येथील ३ हजार ८८६ रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी १ रुग्ण हिवतापाचा निघाला. कापरे आरोग्य केंद्राअंतर्गत १ हजार ९३१ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तेथे एकही रुग्ण आढळला नाही. दादर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५ हजार ८ रुग्णांचे रक्तांचे नमुने तपासण्यात आले. तेथे १ रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात २ हजार २६ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. येथे एकही रुग्ण मलेरियासदृश आढळला नाही. कामथे कुटीर रुग्णालयाअंतर्गत ३ हजार ६८९ रुग्णांचे रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. या ठिकाणीही हिवतापाचा रुग्ण आढळून आला नाही. चिपळूण नगर परिषद दवाखानाअंतर्गत २ हजार ७१२ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये १ पॉझिटिव्ह रुग्ण निघाला. शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत ३ हजार २४३ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. येथे एकही हिवतापाचा रुग्ण आढळला नाही. सावर्डे प्राथमिक केंद्राअंतर्गत ४ हजार ५३० रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली. येथे २ रुग्ण हिवताप पॉझिटिव्ह आढळले. फुरुस प्राथमिक केंद्राअंतर्गत १ हजार ६६५ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. येथे एकही रुग्ण हिवतापाचा आढळला नाही. वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २ हजार ५०४ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. तेथेही हिवतापाचा रुग्ण या कालावधीत आढळला नाही. जानेवारी ते डिसेंबर अखेर ३५ हजार ३४५ रुग्णांचे रक्त तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Five patients of malaria found in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.