संगमेश्वर तालुक्यात पाच गावांना दरडी कोसळण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:46 PM2019-06-24T13:46:07+5:302019-06-24T13:47:11+5:30
देवरूख : कसबा, पांगरी, कोळंबे, साखरपा, आंबा घाट या पाच गावांमध्ये पावसाळ्यात भूस्खलन, डोंगर खचणे तसेच दरडी कोसळण्याचा धोका ...
देवरूख : कसबा, पांगरी, कोळंबे, साखरपा, आंबा घाट या पाच गावांमध्ये पावसाळ्यात भूस्खलन, डोंगर खचणे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असून, भविष्यात कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून याकरिता खबरदारीचे उपाय म्हणून या गावांना तहसील कार्यालयाकडून धोका असल्याची सूचना देण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी कोळंबे तसेच कोंड्ये गावात भूस्खलामुळे वाड्यांना धोका निर्माण झाला होता. येत्या पावसाळ्यात संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे, कसबा, पांगरी, साखरपा, आंबा घाट या पाच गावांना भूस्खलन व डोंगर खचण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता तहसील कार्यालयाकडून वर्तविण्यात आली आहे.
या तीन वाड्या डोंगर उतारावर वसल्या असल्याने पावसाळ्यात आपत्कालिन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी महसूल विभागाकडून या वाड्यांमधील २५ कुटुंबांना स्थलांतरीत होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. कोळंबे गावातील वाड्यांमध्ये दरडी कोसळणे, भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. या वाड्यांचे स्थलांतर करण्यात यावेत, अशी मागणी होत होती. मात्र, अजूनही ती मागणी पूर्ण झाली नसल्याने या ग्रामस्थ स्थलांतरीत झालेले नाहीत.