रत्नागिरीत झाले फ्लेमिंगोचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 03:50 PM2021-11-17T15:50:17+5:302021-11-17T15:51:11+5:30
रत्नागिरी : दक्षिण कोकणात कधीही न दिसणारा फ्लेमिंगो पक्षाचे रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे दर्शन झाले. या पक्षाचे स्वस्तिक गावडे ...
रत्नागिरी : दक्षिण कोकणात कधीही न दिसणारा फ्लेमिंगो पक्षाचे रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे दर्शन झाले. या पक्षाचे स्वस्तिक गावडे या हौशी छायाचित्रकाराने छायाचित्र काढले आणि कधीही न दिसणाऱ्या फ्लेमिंगोबाबत कुतूहल निर्माण झाले.
फ्लेमिंगो या पक्षाला मराठीत ‘रोहित पक्षी’ असे म्हणतात. हा एक पाणपक्षी असून, लांब गळा, काठीसारखे पाय आणि लालसर रंगाचा पंख अशी या पक्षाची वैशिष्ट्य आहेत. या पक्षाच्या लेसर फ्लेमिंगो, चिलीयन फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, ॲडियन फ्लेमिंगो, जेम्स किंवा पुना फ्लेमिंगो आणि अमेरिकन किंवा कॅरिबियन फ्लेमिंगो अशा सहा जाती आहेत. हे पक्षी भारतामध्ये उजनी जलाशय (पुणे) किंवा जायकवाडी (औरंगाबाद) येथे हा पक्षी मोठ्याप्रमाणात आढळतात.
हे पक्षी पाणथळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात. दक्षिण कोकणात हा पक्षी दिसल्याच्या फारशा नोंदी नाहीत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील परिसरात या पक्षाचे दर्शन झाले. प्रथमच हा पक्षी या भागात दिसल्याने पक्षीप्रेमींसाठी आणखी एक पर्वणी ठरली आहे.