चिपळुणात पुरसदृश्य स्थिती, मुसळधार पाऊस सुरूच; वाशिष्ठी, शिवनदीने गाठली धोक्याची पातळी

By संदीप बांद्रे | Published: July 19, 2023 10:00 AM2023-07-19T10:00:44+5:302023-07-19T10:01:32+5:30

बुधवारी पहाटेपासून येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर देखील पावसाची संततधार सुरुच आहे.

Flood-like situation in Chiplun, heavy rains continue; Vashishti, Sivnadi reached danger level | चिपळुणात पुरसदृश्य स्थिती, मुसळधार पाऊस सुरूच; वाशिष्ठी, शिवनदीने गाठली धोक्याची पातळी

चिपळुणात पुरसदृश्य स्थिती, मुसळधार पाऊस सुरूच; वाशिष्ठी, शिवनदीने गाठली धोक्याची पातळी

googlenewsNext

चिपळूण - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी येथे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. या परिस्थितीमुळे येथील प्रशासन व नगर परिषद नियंत्रण कक्ष सतर्क झाले आहे. बाजारपेठही पाणी शिरल्याने नगर परिषदेने सलग तीन वेळा भोंगा वाजवून व शहरात गाडी फिरवून सतर्कतेचा इशारा दिला. व्यापारी वर्गासह नागरिक धास्तावले आहेत.

येथे दोन दिवस पाऊस संततधार सुरू आहे. मात्र मंगळवारी सायंकाळपासून धो-धो पाऊस पडतो आहे. या पावसामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. बुधवारी पहाटेपासून येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर देखील पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीने पुन्हा धोक्याची पातळी गाठली. बाजारपुलाच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्ता बंद पडला आहे. या परिस्थितीमुळे येथील व्यापारी वर्ग धास्तावला असून काहींनी दुकानातील माल हलवण्यास सुरुवात केली आहे. तसेच नगर परिषदेने सकाळी ९.३० वाजता सलग तीन वेळा भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा दिल्याने बाजारपेठ परिसरातील नागरिकांनीही घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

सह्याद्री खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोलकेवाडी आणि पोफळी २२० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तसेच चिपळूण परिसरात 143.88 मिलिमीटर, तर आतापर्यंत 1300.99 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. 

Web Title: Flood-like situation in Chiplun, heavy rains continue; Vashishti, Sivnadi reached danger level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस