पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:32 AM2021-07-28T04:32:45+5:302021-07-28T04:32:45+5:30
झाड तोडण्याची मागणी राजापूर : तालुक्यातील जैतापूर, चव्हाटावाडी येथील बाजारपेठेत भररस्त्यावर राहत्या घरावर असलेले धोकादायक माड तोडण्याची मागणी करण्यात ...
झाड तोडण्याची मागणी
राजापूर : तालुक्यातील जैतापूर, चव्हाटावाडी येथील बाजारपेठेत भररस्त्यावर राहत्या घरावर असलेले धोकादायक माड तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. वर्दळीचा हा भाग असल्याने माड पडला तर घराचे नुकसान होऊ शकते. जीवितहानीचाही धोका आहे.
संपर्काचे आवाहन
रत्नागिरी : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात संकट ओढवले. अद्याप जनजीवन पूर्ववत आले नसले तरी त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक कुटुंबात लहान मुले असल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरुपाची काळजी व संरक्षणाची गरज आहे. अशा मुलांच्या पालकांनी, संस्थांनी जिल्हा बालकल्याण समिती रत्नागिरीकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
परवानगीची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये हजारो मच्छीमार जुन्या पारंपरिक बोटी घेऊन मासेमारी करतात. अनेक बोटी जीर्ण झाल्याने त्या मोडून त्यांची व्हीआरसी, नवीन बोटींना दिली तर मच्छीमारांना चांगले दिवस येतील, अशी मागणी नासीर वाघू यांनी केली आहे. व्हीआरसीवरती नवीन बोटींना परवानगी देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
पाण्याची उपलब्धता
आरवली : येथून जवळच असलेल्या कडवई गावातील आझाद क्लबतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. जमातूल मुस्लीमीन कडवई व आझाद स्पोर्टस् क्लबतर्फे पाण्याचा साठा देण्यात येत आहे. तरुणांच्या या कामाबद्दल कौतुक केले जात आहे.
बंधाऱ्याची मागणी
गुहागर : तालुक्यातील पेवे उपकेंद्राची इमारत मादाली नदीच्या किनाऱ्यावर आहे. नदीजवळ मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या या पाण्याला धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली आहे. या ठिकाणी बंधारा झाल्यास उपकेंद्रात पाणी शिरणार नाही. त्यामुळे तातडीने याची दखल घेणे गरजेचे आहे.