पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:13+5:302021-08-12T04:35:13+5:30
चिपळूण : अखिल कोकण युवा संघ, पुणे यांच्या माध्यमातून चिपळुणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पुण्यातील पदाधिकारी ...
चिपळूण : अखिल कोकण युवा संघ, पुणे यांच्या माध्यमातून चिपळुणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पुण्यातील पदाधिकारी यांनी उपस्थित राहून हे वाटप केले. चिपळूण शहरातील कावीळतळी, वडनाका, कळंबस्ते, मजरेकाशी आदी ठिकाणी चादर, चटईसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा ९ ऑगस्टअखेर एकूण १० हजार ४५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १७३५.२० मिमी इतकी नोंद झाली होती. या वर्षी २७८६ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेने तब्बल १,०५१ मिमीच्या सरासरीने अधिक पाऊस झाला आहे.
युवामंचची मदत
आरवली : परशुराम युवामंच, आरवली माखजन यांच्या वतीने चिपळुणातील पूरग्रस्तांना धान्याचे किट वितरित करण्यात आले, तसेच साफसफाईसाठीही श्रमदान करण्यात आले. या पूरग्रस्तांना धान्य, भांडी, तसेच सतरंज्या आणि औषधांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी परशुराम युवा मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
पूरग्रस्त महिलांना मदत
सावर्डे : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सहकार्याने आणि विकास सहयोग प्रतिष्ठानच्या पुढाकाराने १३० पूरग्रस्त महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. विकास सहयोग प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेतर्फे नाबार्ड आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सहकार्याने चिपळूणमध्ये महिला उद्योजकतेसाठी काम केले जात आहे.
रस्ता धोकादायक
रत्नागिरी : शिवाजीनगर आयटीआय जोडणाऱ्या मार्गावर नाचणे रोडलगत रस्त्यावरील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. या खड्ड्यांमध्ये मोठमोठ्या आकाराची डबर टाकण्यात आली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांचा वाहन चालकांना त्रास होत होता, परंतु आता ही डबर टाकल्याने छोट्या दुचाकी गाड्या घसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.