व्यापाऱ्यांकडून पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:48+5:302021-07-31T04:31:48+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव-जाकादेवी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दीड लाख रुपये जमा करून त्यातून खरेदी केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप चिपळूण शहरातील ...
रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव-जाकादेवी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दीड लाख रुपये जमा करून त्यातून खरेदी केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप चिपळूण शहरातील पूरग्रस्तांना करण्यात आले. व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
पंचक्रोशीतील ग्रामस्थ भयभीत
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी पाझर तलावाला भगदाड पडल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. महसूल, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष धरणाजवळ जाऊन वस्तुचस्थितीची पाहणी केली आहे.
गणपतिपुळेकडे भाविकांची पाठ
गणपतिपुळे : महापूर, अतिवृष्टी, कोरोना महामारी या प्रमुख कारणांमुळे २७ जुलैच्या अंगारकी यात्रोत्सव देवस्थानच्या वतीने रद्द करण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य भक्तांनी श्रीक्षेत्र गणपतिपुळेकडे पाठ फिरवली आहे.
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात
साखरपा : गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या आंबा घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. आंबा घाटात दरडी कोसळल्या आहेत.
चार दिवस कचरा पडून
चिपळूण : शहरातील गुहागर बायपास रोडवरील कचरा चार दिवस झाले तसाच पडून आहे. तिथला कचरा एकदाही उचलला गेलेला नाही. राधाताई लाड सभागृह व काही भागात अद्याप कचऱ्याचे ढीग आहेत. बायपास रोडप्रमाणेच बाजारपेठेतील काही भागातील कचराही अद्याप एकदाही उचललेला नाही.