नदीकाठच्या गावांमध्ये शिरले पुराचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:48+5:302021-07-22T04:20:48+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने फुणगूस आणि माखजन येथील शास्त्री आणि गडनदीने नेहमीच्या पाण्याची ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने फुणगूस आणि माखजन येथील शास्त्री आणि गडनदीने नेहमीच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्ट्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी पुराच्या पाण्याने संपूर्ण खाडीभागाला वेढा घातला आहे.
खाडीलगत असलेल्या दहा ते बारा गावातील भातशेतीत पाणी घुसल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे अर्धवट सोडून घरचा मार्ग पत्करावा लागला असून, शेतात काढून ठेवलेल्या भाताची रोपे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेली आहेत. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी घुसले होते. दत्तमंदिर नदीलाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन तेथील घराजवळ व भातशेतीमध्येही पाणी घुसले. यामुळे खाडी भागातील संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले.
माखजन बाजारपेठेतही सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. भातशेती क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. सततच्या पावसामुळे गडगडी धरण येथील कालव्याची भिंत वाहून गेली आहे.
210721\20210721_150306.jpg~210721\1750-20210721_150148.jpg~210721\1750-20210721_150148.jpg
संगमेश्वर :परचुरी येथे पुराच्या पाणी भातशेतीसह परिसरात शिरले आहे~संगमेश्वर :परचुरी येथे पुराच्या पाणी भातशेतीसह परिसरात शिरले आहे~संगमेश्वर :परचुरी येथे पुराच्या पाणी भातशेतीसह परिसरात शिरले आहे