नियम पाळा, संभाव्य धोका टाळा : दिगंबर तेंडुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:57+5:302021-07-23T04:19:57+5:30

सावर्डे : शासकीय स्तरावरुन कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी एक सतर्क पालक म्हणून आपण नियमितपणे ...

Follow the rules, avoid potential danger: Digambar Tendulkar | नियम पाळा, संभाव्य धोका टाळा : दिगंबर तेंडुलकर

नियम पाळा, संभाव्य धोका टाळा : दिगंबर तेंडुलकर

Next

सावर्डे : शासकीय स्तरावरुन कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी एक सतर्क पालक म्हणून आपण नियमितपणे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून, कोरोनाविषयक असणारे समज-गैरसमज दूर ठेवून आपल्या व मुलांच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. मास्क, योग्य शारीरिक अंतर व वेळोवेळी हात धुणे या त्रिसुत्रीची अमलबजावणी करावी, असा सल्ला डाॅ. दिगंबर तेंडुलकर यांनी दिला.

चिपळूण पंचायत समिती सदस्य पूजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ‘महिलांचे आरोग्य, कोरोना कालावधीत घ्यावयाची काळजी व बालसंगोपन’ याविषयी मार्गदर्शन, चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपरांत हाॅस्पिटलचे डाॅ. दिगंबर तेंडुलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पूजा निकम, सावर्डेच्या नवनिर्वाचित सरपंच समीक्षा बागवे, ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत, अमर भोसले, राजीव कांबळे व सावर्डे परिसरातील महिला उपस्थित होत्या. पूजा निकम यांनी मार्गदर्शक डॉ. दिगंबर तेंडुलकर यांचे स्वागत केले.

डाॅ. दिगंबर तेंडुलकर म्हणाले की, शासकीय स्तरावर १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. अद्यापही १८ वर्षाखालील मुलांना लसीकरण करण्यासंदर्भातील नियोजन झालेले नाही. म्हणून आपण कोरोनाविषयक काही लक्षणे आढळल्यास न घाबरता ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे संपर्क साधा. कोणताही आजार अंगावर काढू नका. प्राथमिक टप्प्यातच कोरोनावर योग्य उपचार झाले तर हा आजार बरा होऊ शकतो. मुलांना आवश्यक असणारी व्हॅक्सिन्स वेळच्या वेळी द्या, त्यांच्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या, त्याचबरोबर स्वतःच्याही आहाराकडे महिलांनी लक्ष देणे आवश्यक आहे. घरातील महिला निरोगी, सक्षम व समजदार असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहू शकते अर्थात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

----------------------

सावर्डे येथे मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. दिगंबर तेंडुलकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी चिपळूण पंचायत समितीच्या सदस्य पूजा निकम, सावर्डेच्या सरपंच समीक्षा बागवे व सदस्य अंकिता सावंत उपस्थित हाेत्या.

Web Title: Follow the rules, avoid potential danger: Digambar Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.