ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने एस. टी. सुरु
By admin | Published: February 9, 2015 09:56 PM2015-02-09T21:56:15+5:302015-02-10T00:26:05+5:30
अतिदुर्गम भाग अशी मेढे गावाची स्वतंत्र ओळख आहे. अनेक वर्षे मूलभूत गरजांपासून हे गाव वंचित होते. अलिकडेच ग्रामस्थांनी ‘एकीचे बळ, मिळते फळ’ या उक्तीप्रमाणे गावात संघटन झाले.
खालगाव : मेढे व कोसबीवाडी (भातगाव) येथील ग्रामस्थांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर जाकादेवी - मेढे नव्याने एस. टी. बस सुरु झाली आहे. या बससेवेचा प्रारंभ हार - तुऱ्यांसोबत फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांबरोबरच चाकरमान्यांनी खास उपस्थिती दाखवून आनंद द्विगुणीत केला.अतिदुर्गम भाग अशी मेढे गावाची स्वतंत्र ओळख आहे. अनेक वर्षे मूलभूत गरजांपासून हे गाव वंचित होते. अलिकडेच ग्रामस्थांनी ‘एकीचे बळ, मिळते फळ’ या उक्तीप्रमाणे गावात संघटन झाले. या संघटनेच्या भक्कम जोरावर गावात रास्त दराचे रेशन दुकान व नदीवरील महत्त्वाचा पूल (साकव) ही कामे मार्गी लागली. आता तर गावात मेढे व कोसबीवाडी (भातगाव) येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तींनी गावातील सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या सामूहिक प्रयत्नातून जाकादेवी - मेढे ही नवीन बस सुरु करून घेतली आहे. याचा विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती, ग्रामस्थ यांना या बसचा लाभ होणार आहे. अनेक वर्षांची गैरसोय व पायपीट आता थांबणार आहे.बसच्या शुभारंभप्रसंगी सरपंच मृगनयना चव्हाण, कोसबीचे सरपंच पांडुरंग वेल्ये, मेढे गावचे उपसरपंच विष्णूपंत चव्हाण, राजाराम देसाई, सुरेश सावंत, मिलिंद देसाई, प्रांजल देसाई, विश्वास निमकर, प्रभाकर कदम, रमाकांत देसाई, गणेश गोताड, शांताराम चव्हाण, रवींद्र चव्हाण, शांताराम जाधव, सुनील चव्हाण, आबा महाडिक, अनिल महाडिक, सुरेश वेल्ये, महिला, ग्रामस्थ, विद्यार्थी, चाकरमानी इतर उपस्थित होते. (वार्ताहर)