आपद्ग्रस्तांना अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:11+5:302021-06-09T04:40:11+5:30

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील वात्सल्य महिला वृद्धाश्रमात देवरुख शहर भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने बामणोली गावातील गरजू आणि ...

Food grains for disaster victims | आपद्ग्रस्तांना अन्नधान्य

आपद्ग्रस्तांना अन्नधान्य

Next

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील वात्सल्य महिला वृद्धाश्रमात देवरुख शहर भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने बामणोली गावातील गरजू आणि नुकसानग्रस्त १७ कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकुंद जोशी, भगवतसिंह चुडावत, वृद्धाश्रमाचे अधीक्षक सुनीलकुमार सिंह आदी उपस्थित होते.

पालूत लसीकरण

लांजा : तालुक्यातील पालू जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये लांजा तालुका आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोविशिल्ड, कोवॅक्सिन हे दोन्ही डोस उपलब्ध करून देण्यात आले. आरोग्य विभागाने ही मोहीम उत्तम नियोजन करून राबविल्याने सर्वांना योग्य प्रकार लाभ मिळाला.

पर्यावरण दिन साजरा

आवाशी : खेड तालुक्यातील कुंभवली येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण आणि चिपळूण येथील यशस्वीनी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रत्येकाने एक झाड लावा, असा संदेश चित्रा चव्हाण यांनी दिला.

फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

देवरुख : संगमेश्वर बाजारपेठ परिसरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी, अ‍ॅंटिजेन पद्धतीने करण्याची मोहीम पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोरोना थोपविण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे; परंतु काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

पेरणीला वेग

साखरपा : पावसाला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी भातपेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर काही ठिकाणी बेर व उकलीचे काम सुरू झाले आहे. साखरपा परिसरातही अनेक भागात पेरणीच्या कामाला वेगात सुरुवात झाली आहे.

निराधार महिलांना मदत

गुहागर : लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत कुणबी युवा संघर्ष समितीतर्फे वसई-विरार येथील १०० निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. यासाठी डॉ. विनय नातू यांचे सहकार्य लाभले.

निराधार फाऊंडेशन स्थापन

चिपळूण : तालुक्यातील शिरगावमधील सामाजिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन निराधार फाऊंडेशनची स्थापना केली आहे. अध्यक्षपदी निसार शेख, उपाध्यक्षपदी संदीप भोसले आणि कार्याध्यक्षपदी अभय कोलगे यांची निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनतर्फे लवकरच जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

संदीप मुळ्ये यांचे यश

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय येथील प्राध्यापक संदीप मुळ्ये यांना योग प्रमाणीकरण मंडल स्तर तीन या परीक्षेत यश मिळाले आहे. ही परीक्षा भारत सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत घेण्यात आली होती. योग शिक्षक व मूल्यांकनकरिता या परीक्षेत यश मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

कांदळवनाचा उपक्रम

रत्नागिरी : कांदळवन कक्षांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खाडी भागातील गावांमध्ये विविध ३९१ प्रकल्प राबविण्यात येत आहेत. गतवर्षी याची सुरुवात झाली आहे. या योजनेतून खेकडा पालन १०१, पर्यटन ४७, शोभिवंत मासे ७०, कालवे १०३ आणि जिताडा माशांचे ७० प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागात संसर्ग

राजापूर : तालुक्यात कडक लॉकडाऊन असूनही ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आरोग्य विभागाकडून अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण जनतेने अधिक सतर्क ता बाळगावी. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसताच चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Food grains for disaster victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.