कोकण रेल्वे मार्गावरील वीरपर्यंत प्रथमच धावणार विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:35 IST2025-01-24T14:33:39+5:302025-01-24T14:35:31+5:30

एकूण १८ डब्यांची गाडी धावणार

For the first time a special train will run to Veer station on the Konkan railway line | कोकण रेल्वे मार्गावरील वीरपर्यंत प्रथमच धावणार विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक 

कोकण रेल्वे मार्गावरील वीरपर्यंत प्रथमच धावणार विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक 

रत्नागिरी : अमरावती ते वीर दरम्यान दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अनारक्षित विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दरम्यान कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून वीर स्थानकापर्यंत धावणारी ही पहिलीच विशेष गाडी आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नवीन अमरावती येथून ही विशेष गाडी (०११०१) दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील वीर स्थानकात ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७:४५ वाजता पोहोचेल.

ही अनारक्षित गाडी परतीच्या प्रवासाला दिनांक ११ फेब्रुवारी रोजी निघणार आहे. वीर ते नवीन अमरावती मार्गावर धावताना ही गाडी (०११०२) वीर येथून रात्री १० वाजता निघेल आणि १२ फेब्रुवारी २५ रोजी ती नवीन अमरावतीला दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. जनरल श्रेणीचे १६ आणि एसएलआर २ अशी एकूण १८ डब्यांची ही गाडी धावणार आहे.

विशेष गाडीचे थांबे

बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नंदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा.

Web Title: For the first time a special train will run to Veer station on the Konkan railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.