चाकरमान्यांसाठी खुशखबर! मेमू रेल्वे उद्यापासून प्रथमच रत्नागिरीपर्यंत धावणार

By मनोज मुळ्ये | Published: September 12, 2023 05:32 PM2023-09-12T17:32:17+5:302023-09-12T17:36:32+5:30

मेमू स्पेशल गाडीचे थांबे अन् वेळ जाणून घ्या

For the first time, MEMU special trains will run from Mumbai to Ratnagiri on the Konkan railway line during Ganesha Festival | चाकरमान्यांसाठी खुशखबर! मेमू रेल्वे उद्यापासून प्रथमच रत्नागिरीपर्यंत धावणार

चाकरमान्यांसाठी खुशखबर! मेमू रेल्वे उद्यापासून प्रथमच रत्नागिरीपर्यंत धावणार

googlenewsNext

रत्नागिरी : या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी पहिल्यांदाच दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी पूर्णपणे अनारक्षित असलेली मेमू रेल्वेची पहिली फेरी बुधवारी (१३ सप्टेंबर) धावणार आहे. दि. २ ऑक्टोबरपर्यंत ही गाडी दररोज धावणार आहे. या गाडीला आधी देण्यात आलेल्या थांब्यांमध्ये रायगडमध्ये सापे वामने, करंजाडी तसेच खेड तालुक्यात अंजनी हे आणखी दोन थांबे वाढवण्यात आले आहेत.

नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्य रेल्वेने यावर्षी गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी १५६ फेऱ्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गणेशाेत्सवात मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. याआधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र, आता गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमू स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार आहेत.

दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी ०११५३/०११५४ या क्रमांकासह धावणार आहे. दि. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत या गाडीच्या ३९ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी ७:१० वाजता ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीसाठी सुटणार आहे. ती दुपारी २:५५ वाजता रत्नागिरीत पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३:४० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल.

मेमू स्पेशल गाडीचे थांबे

रोहा, माणगाव, वीर, सापे, वामने, करंजाडी, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड.

Web Title: For the first time, MEMU special trains will run from Mumbai to Ratnagiri on the Konkan railway line during Ganesha Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.