अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्याला ७ वर्षे सक्तमजुरी
By शोभना कांबळे | Published: February 21, 2023 06:05 PM2023-02-21T18:05:36+5:302023-02-21T18:05:56+5:30
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी दोन वर्ष वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करणार्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने मंगळवारी ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी दोन वर्ष वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करणार्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने मंगळवारी ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
गंधार प्रदीप साळवी (३१,रा.मांडवी,रत्नागिरी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडीतेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानूसार,गंधारने पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्याशी मैत्री केली होती.त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याने ती दोघ एकमेकांना भेटून फिरायाला जात होती.तेव्हा गंधारने पिडीतेला मित्राच्या फ्ॅलटवर नेउन तिच्याशी शारीरीक संबंध केले.२० जुलै २०१७ ते ७ जलुै २०१९ या दोन वर्षांच्या काळात गंधार तिला लग्नाचे आमिष दाखवून तसेच आपल्या प्रेमसंबंधाबाबत घरी सांगेन असे सांगून तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित केले होते.
दरम्यान, ७ जुलै २०१९ रोजी गाडीमध्ये त्याने पिडीतेशी संबंध करुन तू अजून वयाने लहान असल्याने मी लग्नाला नकार देत असल्याचे तिला सांगितले.पिडीतेने याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गंधार विरोधात भादंवि कलम ३७६,५०६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत ३,४,७,८ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक डी.डी.मुसळे आणि लक्ष्मी सुर्यवंशी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.सरकारी पक्षातर्फे अॅड.मेघना नलावडे यांनी एकूण १७ साक्षिदार तपासत केलेला युक्तिवाद विशेष पोक्सो न्यायाधिश वैजयंतीमाला राउत यांनी ग्राह्य मानून गंधार साळवीला भादंवि कलम ३७६ मध्ये ७ वर्ष शिक्षा १० हजार रुपये दंड,भादंवि कलम ५०६ मध्ये २ महिने शिक्षा २ हजार रुपये दंड,पोक्सो कायद्यांतर्गत ३,४ मध्ये ७ वर्ष शिक्षा आणि १० हजार दंड तसेच ८ मध्ये ३ वर्ष शिक्षा ५ हजार दंड अशी एकूण ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हेड काँस्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.