पंचायत समितीच्या शिवसेनेच्या माजी सभापती बेपत्ता प्रकरणी त्यांच्या पतीची चौकशी
By अरुण आडिवरेकर | Published: September 9, 2022 05:39 PM2022-09-09T17:39:15+5:302022-09-09T17:40:24+5:30
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या बेपत्ता झाल्या असून याप्रकरणी त्यांच्या पतीची चौकशी होत आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत सावंत यांच्या पत्नी स्वप्नाली सुकांत सावंत या मागील ९ दिवसांपासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी पती सुकांत सावंत यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याबाबत पती सुकांत सावंत यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांचा शोध सुरू केला आहे. दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास कोणालाही न सांगता सावंत अचानक बेपत्ता झाल्या होत्या.
मात्र आता या प्रकरणात पती सुकांत यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा शोध सुरू असतानाच आता पोलिसांनी त्यांचे पती सुकांत सावंत यांनाच चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. याप्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.