राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:41+5:302021-05-15T04:30:41+5:30
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर (६३) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. गतवर्षी एप्रिल महिन्यात ...
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर (६३) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाची परिस्थिती असतानाच त्यांचे लहान भाऊ दिलीप खेडेकर यांचे निधन झाले होते. त्यापाठोपाठ ही घटना घडल्याने खेडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेली अनेक वर्षे श्रीकृष्ण खेडेकर हे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत होते. त्याआधी ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला होते. मंडणगड येथे शाखाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश केला होता. सलग १० वर्षे ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याशिवाय वैश्य समाजाचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. वैश्य समाजाचे जिल्हा सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. वैश्यवाणी नागरी पतसंस्था स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, मोठा भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.