रिफायनरीविरोधातील आंदोलनाचा उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा; लवकरच भूमिका जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 04:03 PM2023-04-25T16:03:20+5:302023-04-25T16:05:01+5:30

बारसू-सोलगावमधील आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडून फोनवर माहिती घेतली आहे.

Former CM Uddhav Thackeray reviewed the agitation against the Refinery Survey Protest | रिफायनरीविरोधातील आंदोलनाचा उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा; लवकरच भूमिका जाहीर करणार

रिफायनरीविरोधातील आंदोलनाचा उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा; लवकरच भूमिका जाहीर करणार

googlenewsNext

मुंबई/रत्नागिरी: बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. बारसू सोलगाव इथे सकाळपासून सुरु असलेल्या परिस्थितीचा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे.

बारसू-सोलगावमधील आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडून फोनवर माहिती घेतली आहे. ठाकरे गट स्थानिकांसोबत असल्याचं याआगोदरच स्पष्ट केल आहे. खासदार विनायक राऊत आज मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची याविषयी भेट घेत चर्चा करणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे याबाबत लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहे. 

ठाकरे गटाच्या भूमिकेवरुन मंत्री उदय सामंत यांनी निशाणा साधला आहे. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साडे नऊचा इव्हेंट करणारे म्हणतात की, रिफायनरी होणार नाही. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली. बारसूची जागा महाविकास आघाडीचे सरकार असताना निश्चित करण्यात आली होती. सर्वेक्षणाला अनेकांचा पाठिंबा असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली. 

दरम्यान, बहुतांश लोकांना ताब्यात घेतल्यानंतर अत्यंत कमी आंदोलक बारसूच्या माळरानावर होते. झाडाच्या सावलीचा आधार घेत ते तेथेच बसून आहेत. मात्र वातावरण निवळले असल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीचे साहित्य घेतलेला कंटेनर सकाळीच पोलिसांच्या ताफ्यातून सर्वेक्षणस्थळी दाखल झाला आहे. बोअरवेलप्रमाणे खोदकाम केले जाणार असल्याने त्यासाठीची यंत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. या कामाला नेमके किती दिवस लागणार आहेत, याची माहिती अजून कोणीही दिलेली नाही. मात्र ३१ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू ठेवण्यात आला आहे.

पोलीस व्हॅनला अपघात; १६ पोलिस जखमी

बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांचे वाहन अवघड वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूला उलटून १६ पोलिस अंमलदार किरकोळ जखमी झाले. आडिवरे गावाजवळील कशेळीकोंड येथील उतारावर सकाळी ही दुर्घटना घडली.

अटक केलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी

रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावत असल्याच्या कारणावरून रत्नागिरी पोलिसांनी प्रकल्प विरोधक नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली असून न्यायालयाकडून त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Former CM Uddhav Thackeray reviewed the agitation against the Refinery Survey Protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.