लांजातील काँग्रेसचे माजी तालुका सरचिटणीस हरी सप्रे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:35+5:302021-06-22T04:21:35+5:30

लांजा : येथील इंदिरा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी तालुका सरचिटणीस हरी तथा नाना सप्रे (८८) यांचे राहत्या ...

Former Congress taluka general secretary Hari Sapre passes away | लांजातील काँग्रेसचे माजी तालुका सरचिटणीस हरी सप्रे यांचे निधन

लांजातील काँग्रेसचे माजी तालुका सरचिटणीस हरी सप्रे यांचे निधन

googlenewsNext

लांजा : येथील

इंदिरा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी तालुका सरचिटणीस हरी तथा नाना सप्रे (८८) यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.

हरी शंकर उर्फ नाना सप्रे यांचे शिक्षण राजापूरला झाले़ त्यानंतर थोडे दिवस शिक्षक म्हणून रायपाटण येथे काम केले. त्यानंतर ग्रामसेवक म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील असोली येथे पदभार स्वीकारला़ कुडाळमध्ये १९६५ साली बदली झाली. कुडाळ येथे केलेल्या उत्तम कामगिरीमुळे शासनाने त्यांची निवड बीएस्सी ॲग्रीकल्चरसाठी केली. शासनाच्या खर्चातून ते शिकले ११ विषय इंग्लिशमध्ये घेऊन बीएस्सी ॲग्रीकल्चर केले. त्यानंतर कुडाळमध्ये कृषी अधिकारी म्हणून १९६६ ते १९६९ मध्ये काम केले़ गेले ३० वर्ष लांजा तालुका काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ,सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Former Congress taluka general secretary Hari Sapre passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.