सर्वात मोठे गद्दार रामदास कदमच, माजी आमदार सूर्यकांत दळवींचा घणाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 02:28 PM2021-12-18T14:28:18+5:302021-12-18T14:32:01+5:30
ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती.
दापोली : रामदास कदम यांनी आजपर्यंत अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. ते शिवसेनेविरोधी वागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेत सर्वात मोठे गद्दार असल्याचा आरोप माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला.
माजी पर्यावरणमंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी पालकमंत्री अनिल परब व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. या टीकेला सडेतोड उत्तर देताना दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर तोफ डागली आहे.
रामदास कदम हेच शिवसेनेतील मोठे गद्धार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती. त्याचे अनेक उदाहरणे आपण देऊ शकतो.
शिवसेनेचा सर्वात मोठा महागद्दार रामदास कदम आहे, विरोधी पक्षनेते पद मिळालं म्हणून अर्ध्या वाटेतून माघारी परतला अन्यथा राणेंसोबत शिवसेना सोडणार होता. माजी आमदार सूर्यकांत दळवींचा घणाघात #RamdasKadampic.twitter.com/8Yvu5PiRly
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांनीच आपल्याला पाडले. लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्याविरोधात कपबशीचा प्रचार सुद्धा कदम यांनी केला होता. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना संपविण्याचे काम वारंवार रामदास कदम यांनी केला असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.