रत्नागिरीचे माजी खासदार, ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 02:37 PM2023-07-27T14:37:55+5:302023-07-27T14:38:48+5:30

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात एक बुद्धिवंत कायदेतज्ज्ञ म्हणून ते परिचित होते.

Former MP of Ratnagiri, Adv. Bapusaheb Parulekar passed away | रत्नागिरीचे माजी खासदार, ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

रत्नागिरीचे माजी खासदार, ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

रत्नागिरी : कोकणातील ख्यातनाम वकील व माजी खासदार ॲड. बापूसाहेब परुळेकर (९४) यांचे आज (२७ जुलै) सकाळी ८:५० वाजता त्याच्या राहत्या घरी निधन झाले.

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात एक बुद्धिवंत कायदेतज्ज्ञ म्हणून ते परिचित होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून बापूसाहेब हे लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते.  रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे ते जिल्हाध्यक्ष होते. १९६० ते १९७० रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते अध्यक्ष होते.
उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून अनेक एज्युकेशन आणि सांस्कृतिक संस्थांचे, शाळांचे त्यांनी काम पाहिलेले आहे. प्रमोटर मेंबर म्हणून रत्नागिरी जिल्हा रोटरी क्लबचे ते सदस्य होते.

पोस्टल ॲडव्हायझर कम्युनिटी फॉर महाराष्ट्र स्टेटचे १९७८ ते १९७९ पर्यंत, त्याचप्रमाणे रेल्वे युजर कम्युनिटी सेंट्रल झोनचे ते ॲग्रीकल्चर कौन्सिलर डेव्हलपमेंट सर्कल यासारख्या अनेक संस्थांवर सामाजिक सांस्कृतिक आणि राज्यस्तरीय कमिटी, समित्यांवर ते अध्यक्ष होते. ते  कायद्यात एज्युकेशन ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स क्लब टेनिस अँड क्रिकेट यासारख्या अनेक कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात मुलगे ॲड. बाबा परुळेकर, पंकज परुळेकर, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची आज दुपारी ३ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

Web Title: Former MP of Ratnagiri, Adv. Bapusaheb Parulekar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.