रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:59 AM2019-04-22T01:59:02+5:302019-04-22T01:59:41+5:30
हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेट्ये यांचे निधन
रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे रात्री साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
१९९६ साली शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असतानाही नगराध्यक्ष होऊन त्यांनी रत्नागिरीच्या राजकारणाची सूत्रे आपल्याकडे घेतली. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत विजयी होऊन रत्नागिरी शहरावर आपली पकड असल्याचे सिद्ध केले होते. मात्र त्यानंतरच्या टप्प्यात ते पराभूत झाले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेथे त्यांना कोणतेही पद मिळाले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीत परतले. रविवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांचे साडेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले.