खेडमधील मटण, मच्छी मार्केटच्या इमारतीचा पाया खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:34+5:302021-07-15T04:22:34+5:30

खेड : जगबुडी नदीकिनारी असणाऱ्या खेड शहरातील मटण मच्छी मार्केट इमारतीचा नदीकडे असलेल्या बाजूचा भाग मोठ्या प्रमाणावर खचल्याने ...

The foundation of the building of Matan, Fish Market in Khed was eroded | खेडमधील मटण, मच्छी मार्केटच्या इमारतीचा पाया खचला

खेडमधील मटण, मच्छी मार्केटच्या इमारतीचा पाया खचला

googlenewsNext

खेड : जगबुडी नदीकिनारी असणाऱ्या खेड शहरातील मटण मच्छी मार्केट इमारतीचा नदीकडे असलेल्या बाजूचा भाग मोठ्या प्रमाणावर खचल्याने मटण-मच्छी विक्रेत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खेडमध्ये पावसाची संततधार सुरू असून, मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. जगबुडी व नारिंगी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दोन दिवसांपूर्वी जगबुडी नदीला आलेल्या पुरामध्ये शहरातील नदी किनाऱ्यावर असलेल्या नगरपरिषदेच्या मटण-मच्छी मार्केट इमारतीचा भाग पाण्याखाली गेला होता. त्याच ठिकाणी इमारतीला मोठेमोठे भगदाड पडल्याची बाब बुधवारी निदर्शनाला आली. बाहेरून आणि आतील भागात इमारतीचा भाग काही फूट खचला आहे. या मार्केटमध्ये मटण विक्रेत्यांचे १७ गाळे असून, मटण खरेदीसाठी खेडमधील ग्राहकांची याठिकाणी गर्दी हाेते.

खेडमध्ये पावसाचा जोर अजून कायम असून, मटण मार्केटची ही इमारत केव्हाही कोसळून जीवितहानी होऊ शकते, अशी भीती येथील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून नगर परिषद प्रशासनाला वारंवार सांगूनही इमारतीच्या अत्यावश्यक दुरुस्त्या न केल्या गेल्याने ही इमारत धोकादायक बनल्याचा आरोप मटण विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

------------------------------------------

खेड तालुक्यातील जगबुडी नदी किनाऱ्यावरील नगर परिषदेच्या मटण-मच्छी मार्केट इमारतीच्या बाजूची भिंत ढासळली आहे.

Web Title: The foundation of the building of Matan, Fish Market in Khed was eroded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.