आंजणारी येथे आराम बसला अपघात, चार प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:36 AM2021-09-06T04:36:19+5:302021-09-06T04:36:19+5:30

लांजा : गणेशाेत्सवासाठी प्रवाशांना घेऊन येणाऱ्या आराम बसची बसथांब्यावर उभ्या असलेल्या एस. टी. बसला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात ...

Four passengers were injured in the accident | आंजणारी येथे आराम बसला अपघात, चार प्रवासी जखमी

आंजणारी येथे आराम बसला अपघात, चार प्रवासी जखमी

Next

लांजा : गणेशाेत्सवासाठी प्रवाशांना घेऊन येणाऱ्या आराम बसची बसथांब्यावर उभ्या असलेल्या एस. टी. बसला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात चार प्रवासी किरकाेळ जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. ५ सप्टेंबर) लांजा तालुक्यातील आंजणारी येथे सकाळी ११.५५ वाजता घडली, तर ट्रकचालकाला गाडी आवरता न आल्याने दुसऱ्या बाजूला जाऊन उलटल्याची घटना याचदरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर आगाराचे चालक मनोहर विश्वनाथ बारस्कर हे एस. टी. बस (एमएच १४, बीटी १४५३) रत्नागिरी पाली मार्गे राजापूर अशी घेऊन येत हाेते. आंजणारी बसथांबा येथे सकाळी ११.५५ वाजता गाडी आली असता. या बसथांब्यावर प्रवासी उतरण्यासाठी बस थांबली हाेती. त्याचवेळी मुंबईतील बाेरिवली येथून देवगडच्या दिशेने जाणारी खासगी आरामबस (एमएच ०४ , जी ८६९१) चालक मंजूनाथ महादेव अल्लामीला हे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना घेऊन गावी येत हाेते. आंजणारी थांब्यावर उभ्या असणाऱ्या एस. टी. बसला आरामबसने पाठीमागून धडक दिली. त्याचवेळी पाठीमागून मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालक अशाेक सुर्वे ट्रक (एमएच ४३, वाय ६६८९) घेऊन येत हाेते. आरामबसवर ट्रक आदळणार हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रक उजव्या बाजूला घेतला. त्यावेळी त्यांचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक उजव्या बाजूला साईटपट्टीवर जाऊन उलटला.

या अपघातामध्ये आरामबसमधील अंधेरी येथील देवगड येथे जाणारे प्रकाश नारायण घाडी (वय ६५), पत्नी सुरेखा प्रकाश घाडी (६१) तसेच गोरेगाव येथून राजापूर येथे जाणारे जय हर्षद नकाशे (१७), त्याची आई सानिका हर्षद नकाशे (४५) यांच्या नाकाला व तोंडाला किरकोळ दुखापत झाल्या. त्यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर सोडण्यात आले आहे. या जखमींना नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी चालक धनेश केतकर घेऊन आले. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस हेडकाॅन्स्टेबल भालचंद्र रेवणे, राजेंद्र कांबळे, शांताराम पंदेरे, दिनेश आखाडे, दत्ता शिंदे, प्रदीप कारंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Four passengers were injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.